Khanapur

गवीरेड्याची शिकार करून त्यांचे मांस विक्री करणाऱ्या दोघांना अटक

Share

नंदगड येथे गवीरेड्याची शिकार करून त्यांचे मांस विक्री करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली .

नंदगड येथे गाविरेड्याची शिकार करून त्याची मांस विक्री होत असल्याची खात्रीलायक माहितीच्या आधारे मुख्य वनसंरक्षक मंजुनाथ चौहान, उप वनसंरक्षक हर्षबानू, सहाय्यक वनसंरक्षक खानापुर, संतोष चव्हाण, उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बी. नंदगड विभागाचे वनसंरक्षक कविता इरणत्ती, नंदगड विभागाचे उप वनसंरक्षक मलप्पा लचयन यांनी ही कारवाई केली.

मांस विक्री करत असताना कलाल गल्ली, नंदगड, येथील हसन अब्दुल रहमान बेपारी तसेच हलशी गावातील डेव्हिड रेहमान फिगेर याला अटक करून सुमारे 11 किलो मांस जप्त केले. वन्य डुकराचे मांस, एक स्कूटी बाईक आणि दोन मोबाईल फोन या कारवाईत जप्त करण्यात आले आहेत . सदर आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. यावेळी वनपरिक्षेत्राधिकारी राघवेंद्र कांतिकर, मल्लेशप्पा बिरादार , समीर शेख उपस्थित होते.या कृत्यात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Tags: