Chikkodi

बेळगाव वकील संघाकडून जागतिक महिला दिन साजरा

Share

बसवेश्वरांनी महिलांच्या विकासासाठी , अनुभव मंडपाची निर्मिती केली . सर्व क्षेत्रात महिला काम करीत आहेत . आजच्या स्त्रिया ह्या सक्षम आहेत . कुठलेही कार्य ते सहज करतात . भारतीय नारींचा आधीपासूनच मोठा इतिहास आहे . बेळगावच्या महिला देखील धैर्यवान आहेत . असे बेळगावच्या तिसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अश्विनी सीरियांनवर म्हणाल्या.

बेळगाव बार असोसिएशन, तसेच वकील परिषद कर्नाटक उत्तर, बेळगाव शाखा आणि जिल्हा कायदा सेवा प्राधिकरण, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या आला . त्या म्हणाल्या कि , आजची स्त्री ही कमजोर नाही . प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहे . शिक्षणामुळे त्यांचे विश्व समृद्ध झाले आहे . आपल्या कुटुंबाबरोबरच , समाजाच्या भल्यासाठी स्त्रियांचे योगदान मोलाचे आहे .

कार्यक्रमाच्या प्रारंभी बेळगाव जिल्हा व सत्र न्यायाधीश,मुस्तफा हुसेन सय्यद आणि बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभू एस. यत्नट्टी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. बेळगाचे तिसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अश्विनी सीरियांनवर , त्याचप्रमाणे सहावे जिल्हा व सत्र न्यायाधीशांचा सत्कार करण्यात आला .

यावेळी दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला , ऍड . सचिन आर. शिवण्णावर, सुधीर चव्हाण उपाध्यक्ष, जी.एन. पाटील, बंटी कफई, प्रभाकर के. पवार, महांतेश टी. पाटील, अभिषेक उदोशी, इरफान बायल आणि पूजा बी. पाटील, सदाशिव हिरेमठ, आणि अन्य वकील उपस्थित होते .

Tags: