Belagavi

२०२३ मध्ये पुन्हा भाजपलाच आणणार सत्तेत : आ. रमेश जारकीहोळी

Share

 

मी कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला सत्ता काबीज करू देणार नाही, अन्य मार्ग अवलंबावा लागला तरी चालेल , मी 2023 मध्ये भाजपचे सरकार आणीन. असे गोकाकचें आमदार आणि माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी सांगितले .
गोकाक येथे बोलताना त्यांनी सांगितले कि , मी राज्यात पुन्हा एकदा भाजपची सत्ता आणणार आहे . मात्र मी सत्तेत कसे आणणार हे उघडपणे सांगू शकत नाही . ते 2023 पर्यंत राज्यात सत्तेवर आले होते. तसेच २०२४ मध्ये केंद्रात भाजप येईल. आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनतील आणि आपण जगाचे मोठे भाऊ बनू.

मोदी पंतप्रधान झाल्यानंतर परदेशातील भारतीयांची धारणा बदलली आहे.

यावेळी रमेश जारकीहोळी यांनी डी के शिवकुमार यांच्या विरोधात जोरदार टीका केली.
डी के चे काम म्हणजे इतर लोकांच्या वैयक्तिक कल्पना सीडी करणे आहे डी के शिवकुमार यांनी माझ्या मुलासमोर सत्य सांगितले. मी खोटं बोललो असेल तर त्या माता लक्ष्मीची शपथ घेतो. माझ्या जवळ काँग्रेसचे काही आमदार येऊन सांगत आहेत . जर तुम्ही त्यांच्या विरोधात बोललात तर ते तुम्हाला सीडी दाखवून घाबरवतील.माझी सीडी बनवली गेली त्यावेळी माझी पत्नी , माझे भाऊ, माझ्या मुलांनी मला नैतिक पाठिंबा दिला. त्यामुळे इतरांचे काय वाटून घ्यायचे .

माझी सीडी कनकपूर तयार केली गेली . पण यामागे बेळगावच्या नायिकेचा हात आहे .
असा अप्रत्यक्षपणे लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर आरोप केला .

 

सीडीच्या ,कारणामुळे काँग्रेस नेते डी के शिवकुमार यांच्या समोर हात जोडून बसतील
पण मी डगमगलो नाही आणि ते उघड झाले. सिद्धरामय्या आणि परमेश्वर चांगले आहेत
पण डीके सीडी दाखवून त्यांना घाबरवत आहेत. असे वक्तव्य रमेश जारकीहोळी यांनी
सिद्धरामय्या, परमेश्वर, यांचीही सीडी डी के शिवकुमार यांच्याकडे असल्याचा अप्रत्यक्ष उल्लेख
केला . कनकपुरमध्ये सीडी कारखाना असल्याचा पुनरुच्चार त्यानी केला .

Tags: