महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सीमावर्ती गावातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या उगार येथील श्री पद्मावती देवी मंदिरात गेल्या तीन दिवसांपासून विश्वशांतीसाठी देवी श्री पद्मावतीची आराधना पूजा भक्तीभावाने पार पडली.

गुरुवार दि. 9 ते शनिवार दि. 11 तारखेपर्यंत पद्मावती मंदिरात, सोंडा जैन मठाचे जगद्गुरू भट्टकलंक भट्टारक स्वामीजी, कम्बदल्ली जैन मठाचे भानुकीर्ती भट्टारक स्वामीजी यांच्या दिव्य उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
नांदणी जैन मठाचे जिनसेन भट्टारक स्वामीजी, कोल्हापूर जैन मठाचे लक्ष्मीसेन स्वामीजी, ओरुर जैन मठाचे धर्मसूर्य भट्टारक स्वामीजी आणि दिव्य उपस्थितीत गेल्या तीन दिवसांपासून धार्मिक विधीद्वारे विश्वशांतीसाठी पूजा सोहळा पार पडला.
महामंडळ आराधना महोत्सवाच्या समांतर कार्यक्रमात शनिवारी गुरुनाथ शांती होम पूर्णाराध्या आहुती होम कार्यक्रम पार पडला. सायंकाळी पद्मावती मंदिरापासून गावातील प्रमुख मार्गावरून पालखी मिरवणूक निघाली.
सोंडा जैन मठाचे जगद्गुरू भट्टा कलंक स्वामीजी यांनी आशीर्वाद देताना सांगितले की, पद्मावती मंदिरात गेल्या आठ वर्षांपासून जागतिक शांततेसाठी महाआराधना महोत्सवाचे आयोजन केले जात असून हजारो श्रावक व श्राविक यात सहभागी होऊन पावन होत आहेत. बाइट
पद्मावती मंदिराचे पुजारी शीतलगौडा पाटील यांनी सांगितले की, गेल्या आठ वर्षांपासून पद्मावती मंदिरात दरवर्षी तीन दिवस सोंडा जैन मठाचे भट्टा कलंक स्वामीजींच्या उपस्थितीत आराधना महोत्सव होत असून यावर्षीही मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले आणि महोत्सव यशस्वी केला.

मंदिराचे पुजारी शांतीनाथ उपाध्ये यांनी पूजा कार्यक्रम यशस्वी करून भाविकांना विश्वशांतीसाठी महापर्व शांती होम पूर्णावतीची माहिती देऊन कार्यक्रम यशस्वी केला. बाइट
शीतलगौडा पाटील, बापूगौडा पाटील, बापूसाहेब पाटील, श्री पद्मावती आराधना महोत्सव समितीचे प्रमुख दाम्पत्य व आराधना समितीचे सर्व सदस्य विधान आशयर स्थानिक पंडित यांनी कार्यक्रम यशस्वी केला.
सायंकाळी आई पद्मावती देवीच्या पालखी महामहोत्सवाच्या कार्यक्रमातही हजारो भाविक सहभागी झाले होते.
कुसनाळ गावातील श्रावकांकडून चार हजार लाडू बनवून भाविकांना वाटण्यात आले.


Recent Comments