Chikkodi

मद्यधुंद अवस्थेत एकाचा चिक्कोडीत दोघांवर चाकूहल्ला

Share

बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी शहरातील पद्मा बारसमोर एकाने दारूच्या नशेत दोघांवर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे.

गुरुवारी रात्री दारूच्या नशेत तिघा मित्रांमध्ये पैशावरून भांडण सुरू झाले. बाळासाहेब नामक एकाने नंदू चव्हाण (42) आणि मोहन हरिहर (34) या दोघा मित्रांवर एकाने चाकूने हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीत बाळासाहेब देखील जखमी झाला आहे.

हे तिघेही चिक्कोडी शहरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. नंदू आणि मोहन यांना बेळगावच्या बीम्स इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. बाळासाहेबवर चिक्कोडी सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिक्कोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

Tags: