Politics

सरकारकडून राज्यात गोशाळांना प्रोत्साहन : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

Share

महसूल वसाहतीत शिक्षण, गोशाळांना प्रोत्साहन दिले जात आहे. याचा अर्थ आम्ही सर्व गोशाळांना जमीन दिली असा होत नाही असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

ते आज विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. गायरान जमीनी याआधी आरएसएसला हव्या असलेल्या संघटनांना दिल्या जात असल्याच्या विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना बोम्मई पुढे म्हणाले, की गायरान जमिनी आम्ही कोणालाही दिलेल्या नाहीत.

खासदार सुमलता यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत बोम्मई यांनी प्रतिक्रिया दिली. याबाबत चर्चेची प्रक्रिया पार पडली असून लवकरच सुमलता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: