उडुपी कृष्ण मठाला जमीन मुस्लिम राजांनी दिल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केल्यावर भाजप सरचिटणीस सी. टी. रवी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. उद्या हिंदुस्थानलाही मुस्लिम राजांनी जागा दिली म्हणतील असे ते म्हणतील असे रवी यांनी सांगितले.

चिक्कोडी तालुक्यातील अंकली येथे भाजपच्या विजय जनसंकल्प यात्रेदरम्यान भाजप राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांनी संबोधित केले. उडुपी मठच नव्हे तर भारताला भारत असे नावही मुस्लिम राज्यकर्त्यांनी दिले असे ते म्हणाले तर नवल नाही. राम मंदिराची बांधणी मुस्लिम राज्यकर्त्यांनीच केली, काशी विश्वनाथाची स्थापना मुस्लिम राज्यकर्त्यांनीच केली, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले तर आश्चर्य वाटायला नको. खोटे बोलण्यात काँग्रेस नेते मशहूर आहेत. खोटारडेपणा आणि काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. खऱ्याचे खोटे करणे, खोटे बोलणे हा त्यांना जडलेला रोग आहे अशी टीका त्यांनी केली.
सी. टी. रवीनी दिलेली साडी जाळल्याच्या मुद्द्यावर, ते सगळे असे नाटक करतात. आम्ही कोणालाच साड्या देत नाहीय, देणार नाही. हे सगळे काँग्रेसचे जुने नाटक आहे असे रवी म्हणाले.
एकंदर, काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यावर रवी यांनी अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.


Recent Comments