Belagavi

राजहंसगडावरील शिवपुतळ्याला डीकेशींकडून नमन

Share

बेळगाव ग्रामीण मतदार संघातील राजहंस गडावर उभारण्यात आलेल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी भेट देऊन नमन केले.

बेळगाव ग्रामीण मतदार संघातील राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा देशातील सर्वात उंच भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून हा पुतळा उभारण्यात आला आहे. काळ, रविवारी त्याचे अनावरण करण्यात आले होते.

 

त्यानंतर क्रॅकर शो, लाईट लेसर शो आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या दरम्यान कर्नाटक काँग्रेस समितीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी रविवारी रात्री राजहंस गडाला भेट देऊन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापुढे ते नतमस्तक झाले. यावेळी जिल्हा कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: