चिक्कोडी तालुक्यात भूजल पातळी वाढवण्यासाठी राज्य सरकारने 6 पूलवजा बंधारे बांधण्यासाठी 7 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी दिली.

चिक्कोडी तालुक्यातील करोशी गावात पूलवजा बंधाऱ्याच्या कामाला चालना दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना कवटगीमठ म्हणाले, पूलवजा बंधाऱ्यामुळे वाहुन वाया जाणारे पाणी थांबून शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे विहिरी व कूपनलिका यांची पाणीपातळी वाढणार आहे. चिक्कोडी तालुक्यात सुमारे 35 बॅरेजेस बांधण्यात आले आहेत. ते म्हणाले की, ऐहोळे यांनी आमदार म्हणून मतदारसंघाला विकासाकडे नेले आहे.

आमदार दुर्योधन ऐहोळे, ग्रामपंचायत अध्यक्षा सावित्री जेधे, विजय कोठीवाले, बसू भाटे, बसवराज माळगे, राजू हिरेकोडी, दुंडय्या हिरेमठ, राजू हरगन्नवर, एकनाथ जेधे, पंचाक्षरी हळीजोळे, बाळू मुगळी, दुंडय्या पुजेरी, बी. बी. बसवगोळ, अण्णप्पा शेंडूरे, फारुख पटेल, रेश्मा देवऋषी, तौसिफ़ पटेल आदी उपस्थित होते.


Recent Comments