मोदी मोदी अशा घोषणा देत , पुष्पवृष्टी करीत अगदी उत्साहाने घोषणा देत , बेळगाववासियांनी पंतप्रधानावरील प्रेम व्यक्त करीत , त्यांचे बेळगाव नगरीत स्वागत केले . पंतप्रधान मोदींनी देखील आपल्या जनतेला हात मोदींनी हात उंचावून लोकांच्या अभिवादनाचा स्वीकार केला. सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेळगावमधील रोड शो दरम्यान ही उत्साहवर्धक दृश्ये पाहायला मिळाली .

पंतप्रधान नरेंद्र मोदी , हेलिकॉप्टरने एपीएमसीजवळील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या आवारात उभारलेल्या हेलिपॅडवर उतरले. त्यानंतर त्यांचा बेळगावामधील रोड शो प्रारंभ झाला . कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत हा रोड शो सुरु झाला . रस्त्याच्या दुतर्फा मोदींना पाहण्यासाठी लोकांनी तुफान गर्दी केली आहे. मोदींनी हात उंचावून लोकांच्या अभिवादनाचा स्वीकार केला. (फ्लो )
पुष्पवृष्टी , भाजपचे ध्वज, फलक, भगवे झेंडे, भगव्या पताका, अनेक ठिकाणी भगव्या कमानी उभारल्या होत्या. मार्गावर दुतर्फा छत्रपती शिवराय आणि भवानी मातेच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले होते. काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, मावळे, आदींचे सजीव देखावेही उभारण्यात आले होते. त्याचप्रमाणे मंगलकलश घेऊन महिलानी मोदीजींचे स्वागत केले . मोदी मोदी अशा घोषणा लोक देत होते .
आपल्या कारबाहेर उभे राहून पंतप्रधान रस्त्याच्या दुतर्फा थांबलेल्या जनतेला हात उंचावून दाखवत होते . एपीएमसी रोडवरील चौकातून सुरु झालेला हा रोड शो , नेहरू नगर, सदाशिव नगर , डॉ . आंबेडकर मार्ग , चन्नम्मा चौक , कॉलेज रोड, छत्रपती संभाजी चौक , रामलिंगखिंड गल्ली , टिळक चौक ,पाटील गल्ली , शनी मंदिर , कपिलेश्वर उड्डाण पूल , एसपीएम रोड , मार्गे , शिवाजी उद्यान , फोर्ट रोड , येडियुरप्पा मार्गावरून , मालिनी सिटी येथील कार्यक्रमस्थळापर्यंत १०. ७ किलोमीटरचा रोड शो संपन्न झाला .

रोड शोच्या मार्गावर दुतर्फा उंच इमारतींवर, बाल्कनीत मोदींना पाहण्यासाठी लोक उभे होते. कपिलेश्वर उड्डाण पुलावर मोदींनी काहीकाळ कार थांबवून लोकांचे अभिवादन स्वीकारले. महिला व पुरुष भाजप कार्यकर्ते भगवे फेटे बांधून मार्गावर उभे होते . (फ्लो )
रोड शोच्या मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .6 एसपी, 11 अतिरिक्त एसपी, 28 डीएसपी, 60 निरीक्षक, 22 केएसआरपी पथके, एकूण 3 हजार जवान सुरक्षेसाठी तैनात ठेवण्यात आले होते

प्रारंभी बेळगाव सांबरा विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले. तेथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, प्रादेशिक आयुक्त एम.जी. हिरेमठ, एडीजीपी आलोक कुमार, माजी आमदार व भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील आणि इतरांनी मोदींचे स्वागत केले.


Recent Comments