Belagavi

एकूण २२५० कोटी रु खर्चाच्या कामकाजाचा पंतप्रधान मोदी करणार शुभारंभ

Share

बेळगावच्या दौऱ्यावर येणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आगमनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून , पंतप्रधान मोदी बेळगावमधून विविध विकास कामांचा प्रारंभ तसेच लोकार्पण करणार आहेत अशी माहीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली .

व्हॉईस ओव्हर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेळगाव दौऱ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली . दुपारी दोन वाजता पंतप्रधान मोदी विशेष विमानाने , बेळगावच्या सांबारा विमानतळावर आगमन होईल . त्यानंतर हेलिकॉप्टर मधून शहरातील एमीएमसी जवळील केएसआरपी ट्रेनिंग स्कूलच्या मैदानावरील हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल . त्याचप्रमाणे , मुख्यमंत्री बसवराज बोम्मई , कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे , नरेंद्र सिंग तोमर , संबंधित मंत्री , आमदार ,खासदार , यांच्यासहित भव्यदिव्य असा रोड शो होईल . बीएस येडियुरप्पा मार्गावरील मालिनी सिटीत भव्य पेंडॉल घालण्यात आला आहे . आयोजकांनी 2 लाख लोकांसाठी आसनांची व्यवस्था केली आहे. 50 एकर परिसरात तिन्ही बाजूंनी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे . मोठ्या प्रमाणावर लोक येणार असल्याने त्यांच्या भोजनाची सोय करण्यात आली आहे . बेळगावच्या इतिहासातील हा रोड शो अविस्मरणीय असा ठरणार आहे .

बेळगाव जिल्ह्यातील विविध भागातून लाभार्थ्यांना येण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे . 1500 हून अधिक बसमधून शेतकरी आणि भाजप कार्यकर्ते येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध विकासकामांचा शुभारंभ करणार आहेत . पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा तेरावा हप्ता जारी करणार आहेत . पंतप्रधान देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ही रक्कम जमा करणार आहेत . 190 कोटी रुपये खर्चून नूतनीकरण केलेल्या बेळगाव रेल्वे स्थानकाचे उद्घाटनदेखील पंतप्रधान मोदी करणार सून , 1098 कोटींच्या जलजीवन मिशनच्या कामाचा शुभारंभ त्याचप्रमाणे जिल्ह्यात 1132 कोटी खर्चाच्या बहु-ग्रामीण पेयजल प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहेत .. त्याचप्रमाणे बेळगाव-धारवाड थेट रेल्वे मार्गाच्या कामाचा शुभारंभ देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे . . एकूण 2,250 कोटी खर्चाच्या कामकाजाचा शुभारंभ पंतप्रधान करणार आहेत. अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली

पत्रकार परिषदेत , राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी , आ . अभय पाटील ,आ. अनिल बेनके , बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील , महांतेश कवटगीमठ तसेच , जिल्हाधिकारी नितेश पाटील उपस्थित होते .

Tags: