Kagawad

शेडबाळ येथे श्री बसवण्णा रथोत्सव उत्साहात

Share

कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील सीमावर्ती गावांमध्ये प्रसिद्ध असलेल्या शेडबाळ येथील श्री बसवण्णा जत्रेच्या निमित्ताने भाविकांनी सुमारे 03 टन वजनाचा रथ हाताने ओढून रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.

शिवरात्रीपासून मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पालखी सोहळा व रथोत्सव साजरा करण्यात आला.
सर्व समाज बांधव, मंदिर समिती सदस्य, मानकरी यांच्या उपस्थितीत मंदिराचे पुजारी कुमार गुरव आणि गुरु गुरव यांनी भक्तीभावाने मंदिरातील बसवण्णा मूर्तीची पूजा केली.
बसवण्णा मंदिर समितीचे अध्यक्ष अशोक पाटील, वर्धमान पाटील, अतिक्रांत पाटील, सुनील पाटील, अश्वथ पाटील, सचिन पाटील, वृषाभ पाटील, शुभम पाटील यांच्या उपस्थितीत केंपवाड साखर कारखान्याचे एम.डी.श्रीनिवास पाटील यांनी रथाचे पूजन केले व भक्तांनी हर-हर महादेव असा जयघोष केला . बसवेश्वर महाराज कि जय असा जयजयकार करीत , .हाताने रथ ओढून रथोत्सव साजरा करण्यात आला.

डॉ. अशोक पाटील, उत्कर्षा पाटील, एम.ए.गणे, रोहिदास मुजावर, सुभाष ढाले, महादेव कलाल, महाधवल यादवडे, कुमार पुजारी आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते.

कागवाड मतदार संघाचे माजी आमदार राजू कागे यांनी हुबळी येथून तयार केलेली 70 किलो रुद्राक्षाची माळ रथाला आणि मंदिरातील त्रिकाल नंदी मूर्तीला अर्पण केली. 33 फूट लांबी . 6 तारांची रुद्राक्षाची माळ तयार करण्यात आली. समाजातील ज्येष्ठ मंडळी महादेव चिंचळी, मंदिराचे पुजारी कुमार गुरुव यांनी पुष्पहार अर्पण केला.

रुद्राक्षी हार अर्पण करताना बाबासाहेब नांद्रे, नेमगोंडा घेणापगोळ, विनोद बारगळे, अण्णा आरवाडे, वृषभ चौघुले, सुमतिनाथ पाटील, कुमार अलगौडर, प्रकाश माळी, श्रीनिवास कांबळे, अनिल ढमाले, गावचे वडीलधारे आदींसह अनेक भाविक उपस्थित होते.

जत्रेच्या निमित्ताने हजारो भाविकांचे आगमन झाले कागवड पीएसआय हनुमंत नरळे यांनी रथोत्सवानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .

Tags: