Chikkodi

शमनेवाडी ग्राम पंचायत अध्यक्षपदाची बिनविरोध निवड

Share

चिक्कोडी तालुक्यातील शमनेवाडी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा गौराबाई गावडे यांनी १३ जानेवारी रोजी ग्रामपंचायत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.त्यामुळे शहनाज उस्मान मुजावर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

या पदासाठी एकाच अर्ज आल्याने अध्यक्षपदासाठी शहनाज उस्मान मुजावर यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी आर.के.उमेश यांनी दिली.


नूतन अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर लगेचच शहनाज मुजावर यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने व अमिता कलावंत, आस्मा कलावंत आणि सहाना कलावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नेते जयकुमार खोत, युवा नेते जितेश खोत , ग्रामपंचायत उपाध्यक्ष भाऊसाहेब खोत , ग्रामपंचायत सदस्य अभिषेक खोत, महावीर पुजारी, सोमनाथ कोळी, दिपाक खोत, मंजुनाथ कांबळे, सुभाष लाड, सचिन खोत, कल्पना तरबेज, सदस्या शोभा तराडे आणि अन्य उपस्थित होते. ,

Tags: