तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी वीरन गौडा एगनगौडर यांनी कुंभार्डा- हंडीभडंगनाथ दरम्यानच्या रस्त्याच्या मेटलिंग कामाची पाहणी केली.

खानापूर तालुक्यातील नागरगाळी ग्रामपंचायत अंतर्गत कुंभार्डा ते हंडीभडंगनाथ या रस्त्यावर मेटलिंगचे काम सुरू झाले आहे, हे काम एमजीएन आरईजी प्रकल्पांतर्गत केले जात आहे, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी वीरन गौडा एगनगौडर यांनी स्वत: या कामाला भेट दिली. या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. प्रेक्षणीय व ऐतिहासिक ठिकाण असलेल्या हंडीभडंगनाथ येथे जाणारा हा रस्ता करण्यात येत आहे .
या वेळी तालुका पंचायत सहायक संचालक देवराज एम, पंचायत विकास अधिकारी बलराज भजंत्री आदी उपस्थित होते.


Recent Comments