Belagavi

२३ आणि २४ फेब्रुवारी रोजी बेळगावच्या सीपीएड मैदानात सादर होणार वीररणी चन्नमा नाटक

Share

बेळगावच्या सीपीएड मैदानावर , वीरराणी कित्तूर चन्नम्मा हे भव्य नाटक २३ आणि २४ फेब्रुवारी असे दोन दिवस विनामूल्य सादर केले जाणार आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे धारवाड रंगायनाचे संचालक रमेश परविनाईकर यांनी सांगितले.

सीपीएस मैदानावर पत्रकार परिषदेला संबोधित करताना, त्यांनी धारवाड रंगायनातर्फे वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांच्या जीवनावर आधारित भव्य नाटक सादर केल जाणार आहे . या आधी या नाटकाचे 16 प्रयॊग झाले आहेत . बेळगावमध्ये हा १७ वा प्रयोग सादर केला जाणार आहे .
या नाटकात अनेक दिग्गज कलाकार आहेत . बाल रंगभूमीच्या कलाकारांनी उत्तम प्रकारे भूमिका साकारली आहे . आणि रंगमंचाचे कामही उत्तम प्रकारे केले आहे. या नाटकात एकूण 350 कलाकार सहभागी झाले आहेत.

या नाटकाला 25 हजार प्रेक्षक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.मराठी लोकांनी ‘जाणता राजा ‘ हे नाटक पाहिलंय असं आढळून आलं आहे, त्याचप्रमाणे आपल्या देशातील कित्तूर चन्नम्मा नाटक मोठ्या संख्येने सर्व चाहत्यांना पाहायला मिळेल अशी माझी भावना आहे. या नाटकातील कलाकारांना रंगायनातर्फे एका नाट्यप्रयोगासाठी 25 ते 30 हजार रुपये अनुदान स्वरूपात दिले जाते. आणि राज्यातील विविध जिल्ह्यातून 1200 जणांमधून 250 कुशल कलाकारांची निवड करण्यात आल्याचे सांगून हे भव्य नाटक यशस्वी करावे असे सांगितले.

डॉ.रवी पाटील यांनी सांगितले कि , राणी चन्नम्मा यांच्यावर आधारित यापूर्वीही अनेक चित्रपट आणि नाटके झाली आहेत. पण मला आशा आहे की ते खूप खास आणि अद्वितीय असेल. उद्या चन्नम्मा सर्कल येथे प्रतिमेचे पूजन केल्यानंतर गदग येथील तोंटदार्य मठाचे सिद्धराम महास्वामीजी नाटकाचा शुभारंभ करतील. हुक्केरी हिरमठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींसहित अन्य स्वामीजी या नाट्य कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या नाटकात सुमारे 350 अनुभवी कलाकार,त्याचप्रमाणे एक हत्ती , . उंट घोडे यांचा समावेश आहे . . याआधीच 10 हजार तिकिटे मोफत कोड करण्यात आली आहेत. बेळगाव जिल्ह्यातील आजूबाजूच्या गावातील लोकांनी या नाटकाचा आस्वाद घ्यावा आणि सायंकाळी 5.30 ते 8.30 या वेळेत हे नाटक सादर होणार आहे. नाटकात प्रेक्षकांच्या सोयीसाठी सुमारे 20 हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. नाट्यप्रदर्शन सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य आहे त्यामुळे सर्व लोकांना त्याचा लाभ घेता येईल
म्हणाले.

यावेळी बसवराज रोटी आणि इतर उपस्थित होते

Tags: