Belagavi

चोरीच्या घटनेसंदर्भात तक्रारीची पोलीस दखल घेत नसल्याचा आरोप

Share

अत्रीवरद येथील मल्टी स्पेशालिटी आयुर्वेद रुग्णालयात चोरी करणाऱ्या चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल करून योग्य न्याय मिळवून द्यावा अशी मागणी वैद्य रुपेश साळुंखे यांनी केली आहे.

टिळकवाडी अत्रिवरद मल्टी स्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल मध्ये चोरीची घटना घडली आहे . केंद्रातील मौल्यवान वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरून पळून गेलेल्यांविरुद्ध त्यांनी टिळकवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, पोलिस तक्रारीची दखल घेण्यास नकार देत असल्याचा आरोप केला.

वैद्य रुपेश साळुंखे यांनी योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली. बेळगाव येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन वैद्य रुपेश साळुंखे यांनी माहिती दिली. 31 जानेवारी रोजी रात्री घडलेल्या चोरीच्या या घटनेत रुग्णालयाचे कुलूप तोडून मौल्यवान औषधे, वैद्यकीय पुस्तके, रुग्णाच्या नोंदीची फाईल, माझ्या व्यावसायिक जीवनाशी संबंधित अनेक प्रमाणपत्रे, संगणक व सी.सी. टीव्हीसह लाखो रुपयांच्या महत्त्वाच्या वस्तू चोरीला गेल्या .

चोरट्यांविरुद्ध टिळकवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र पोलीस आपल्या तक्रारीची दखलच घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला पोलिसांचे वर्तन सामाजिकदृष्ट्या अप्रिय असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी अंजना अशोक इमानदार व ऐश्वर्या इमानदार यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करून मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

Tags: