Bailahongala

घरांची हक्कपत्रे वितरित करण्याची बैलहोंगलच्या हरळय्या कॉलनीतील रहिवाशांची मागणी

Share

४० वर्षांपासुन घरे बांधून वास्तव्य करून असलेल्या बैलहोंगल येथील रहिवाशांना बैलहोंगल नगरपालिकेने घरांची हक्कपत्रे वितरित करावीत , अशी मागणी कर्नाटक आंबेडकर युवा सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष परशुराम रायबाग यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे .
व्हॉईस ओव्हर : जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात निवेदन देण्यासाठी आले असताना त्यानी प्रसार माध्यमांना माहिती दिली . ते म्हणाले कि ,

बैलहोंगल येथील हरळय्या कॉलनीत आम्ही गेली 40 वर्षे घरे बांधली आहेत, आम्ही पालिकेला घरपट्टी वेळेवर भरत आहोत आणि आमच्या घरांची मालकी बैलहोंगल नगरपालिकेकडे आहे, आम्हाला या घरांची हक्कपत्रे वितरित करण्यासाठी तालुका प्रशासन आणि नगरपालिकेला अनेकदा आवाहन केले आहे. मात्र याबाबतीत .कोणतीही कार्यवाही झालेली नाही ही खरोखरच संतापजनक बाब आहे. बैलहोंगलच्या आमदारांना देखील याबाबत निदर्शनास आणून देखील महाल आश्वासनांखेरीज काही मिळाले नाही . आमच्या घरांचा सर्व्हे क्रमांक लवकर लागू करण्यात यावा तसेच आम्हाला घरांची हक्कपत्रे वितरित करावीत अशी मागणी कर्नाटक आंबेडकर युवक सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष परशुराम रायबाग यांनी केली.

यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले

यावेळी सुरेश आगसी, मंजुनाथ रायबाग, उमेश दोड्डामणी, यशवंत , गोरेसाब मुजावर, रामू उमर, जाविद नूलकर, कृष्णा नाईककर रामू कलंकर, मल्लाप्पा भजंत्री आदींसह जवळपास ५० घरातील महिला आणि पुरुष या आंदोलनात सहभागी झाले होते .
**

Tags: