कागवाड तालुक्यातील शिरगुप्पी गावात, संजीवनी महिला संघाच्या बचत गटांना सामुदायिक भांडवल निधीचा धनादेश वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .

कागवाड तालुका कर्नाटक राज्य ग्रामीण उपजीविका समरसता संस्था आणि जिल्हा पंचायत बेळगाव , तालुका पंचायत कागवाड , शिरगुप्पी ग्रामपंचायत , राज्य शासन कौशल्य विकास उद्योजकता आणि उपजीविका विभाग , शिरगुप्पी ग्रामपंचायत स्तरीय संजीवनी महिला संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सामुदायिक भांडवल निधीचा धनादेश वाटप कार्यक्रम कागवाड येथील यतीश्वरानंद स्वामीजींच्या उपस्थितीत पार पडला . गावातील स्वसहाय्य संघाना धनादेश वाटप कार्यक्रम कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
शिरगुप्पी ग्रामपंचायतीत कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांच्या हस्ते 72 बचत संघांपैकी , 18 बचत संघांच्या सभासदांना 25 लाख रुपयांच्या मदत निधीचे धनादेश वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिक्कोडीचे विभागीय अधिकारी माधव गीता, बेळगाव जिल्हा नियोजन अधिकारी रवी बंगारप्पनवर, ग्रामपंचायत अध्यक्षा अपर्णा पाटील होत्या.

आमदार श्रीमंत पाटील यांनी समारंभाला संबोधित करताना, कोणत्या देशात, कोणत्या राज्यात महिलांना चांगला दर्जा आणि सन्मान दिला जातो, तिथे सुख-शांती नांदते . असे सांगून महिलांनी प्रत्येक पदावर आपले कर्तव्य बजावले आहे. स्त्रिया आनंदाने जगण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. त्यांच्यामुळेच आर्थिक व्यवस्था मजबूत राहू शकते, असे आमदार म्हणाले
कागवाडच्या गुरुदेव आश्रमाचे यतीश्वरानंद स्वामीजी म्हणाले की, आमदार श्रीमंत पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्व गाजवले आहे. 72 महिला स्वसहाय्य संघाना शासनाकडून अनुदान प्राप्त झाले आहे. महिला संघटनेच्या सदस्यांनी त्याचा चांगला उपयोग करून घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली.
चिक्कोडी तालुका विभागीय अधिकारी माधव गीता म्हणाले की, राज्य शासनाने महिलांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. त्याचा लाभ घेतला पाहिजे. बचत संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाचा आणि गावांचा विकास करणे शक्य आहे. आता 18 बचत संस्थांना 25 लाखांचे अनुदान देण्यात आले आहे. यापुढेही इतर संघटनांना मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन अधिकारी रवी बंगारप्पनवार म्हणाले की, राज्य सरकार स्वसहाय्य संघ गटांच्या सर्व सदस्यांना आर्थिक मदत करत आहे.

पीकेपीएस संघटनेचे निमंत्रक शिरगुप्पी गावचे ज्येष्ठ वकील अभयकुमार अकिवाटे म्हणाले की, आमदार श्रीमंत पाटील यांच्यापासून मतदारसंघाने विकास पाहिला आहे. “महिला बचत गटांना, गावातील अल्पसंख्याक समुदायांना, विविध समाजातील मंदिरे आणि घरांच्या विकासासाठी अनुदान दिल्याबद्दल मी आमच्या गावाच्या वतीने त्यांचे आभार मानू इच्छितो.”
ग्राम पंचायत अध्यक्षा अपर्णा पाटील उपाध्यक्षा श्रुती कांबळे, संजीवनी संघाच्या अध्यक्षा जयश्री सवदी, संजीवनी कांबळे, गीतांजली चौघुले, शिरगुप्पी गावचे जेष्ठ नागरिक शिवानंद पाटील, अभयकुमार अकिवटे, भोमण्णा चौघुले, रामगौडा पाटील, अशोक कात्राळे, अमिताभ पाटील, अमिताभ पाटील, बडगे पाटील आदी उपस्थित होते. पाटील, सचिन जगताप आदींसह अनेकजण उपस्थित होते.


Recent Comments