Belagavi

रमेश जारकीहोळी,चन्नराज हट्टीहोळी यांची कार आमनेसामने

Share

बेळगाव तालुक्यातील राजहंसगड येथे उभारण्यात येत असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरून भाजप आणि कॉंग्रेस पक्षात जोरदार राजकारण सुरू झाले आहे . या पुतळ्याच्या वैकास कामकाजाची पाहणी करण्यासाठी आलेले चन्नराज हट्टीहोळी आणि रमेश जारकीहोळी हे एकमेकांसमोर उभे ठाकले . .

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले आहे. आज आ. हेब्बाळकर यांचे भाऊ चन्नराज हट्टीहोळी येथे आले, तर त्याचवेळी रमेश जारकीहोळी , माजी आमदार संजय पाटील हे देखील राजहंसगडावर आले होते . . यावेळी चन्नराज हट्टीहोळीना परत जाण्याचा प्रस्ताव दिला. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

रमेश जारकीजोळी यांनी आपली कार चन्नराज हट्टीहोळी यांच्या कारसमोर उभी केल्याने चन्नराज हट्टीहोळी समर्थकांनी संताप व्यक्त केला.

Tags: