शिवरात्रीचा एक भाग म्हणून हुक्केरी तालुक्यातील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी आहे .

शहरातील जुन्या बसस्थानकाजवळील ईश्वरलिंग मंदिरात पहाटेपासून स्वच्छ कपडे परिधान केलेल्या महिला व बालकांनी देवाचे दर्शन घेतले.
कोर्टा सर्कलजवळील शिवमंदिरात पुजारी बाबू हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली विशेष पूजाविधी पार पडला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना मंदिराचे भक्त सुरेश किल्लेदार म्हणले कि दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीला भाविक शिवाला अभिषेक करण्यासाठी येत आहेत . त्यांना उपवासाच्या प्रसादाचे वाटप केले जात आहे .
यावेळी शिवमंदिरात शिवाचे दर्शन घेण्यासाठी शेकडो भाविकांनी रांगा लावल्या होत्या.
संकेश्वर नगर येथील शंकरलिंग मंदिर व हिडकल धरण येथील शिवालयात शिवरात्री साजरी करण्यात आली.


Recent Comments