अथणी शहरातील हल्याळ रोडवरील मंजुश्री हॉटेलसमोर उसाने भरलेला ट्रॅक्टर उलटला असून, त्याखाली तिघेजण सापडून जखमी झाले . यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

अथणी हारुगेरी रोडवर शुक्रवारी दुपारी ऊस भरून कारखान्याकडे निघालेला ट्रॅक्टर उलटला. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर ऊस पसरला . जेसीबीच्या साहाय्याने जमलेल्या लोकांनीही ऊस बाजूला करून ,या उसाखाली अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यात आले .
ह्या उसाखाली सापडून एक पुरुष आणि दोन महिला जखमी झाल्या . स्थानिकांनी त्यांना उसाच्या ढिगाखालून बाहेर काढून रुग्णवाहिकेतून मिरज रुग्णालयात हलवले .
यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अथणी पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत ही घटना घडली असून ,पोलिसांनी देखील तातडीने भेट देऊन जखमींना बाहेर काढण्यासाठी कार्यवाही केली ..


Recent Comments