Kagawad

श्री बसवेश्वर पाटबंधारे प्रकल्प लवकरच होणार कार्यान्वित

Share

कागवाड तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी असलेला खिलेगाव श्री बसवेश्वर सिंचन प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक विद्युत पंपसेटसाठी 3.50 कोटी रुपये वापरण्यात येणार आहेत. आमदार श्रीमंत पाटील यांनी पाटबंधारे विभागाला काम सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या.

केंपवाड येथील आमदार कार्यालयात पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून आवश्यक वीज कनेक्शन देण्यासाठी आर्थिक मदत देण्यात आली.
कागवडच्या आमदारांनी त्यांच्या अथणी साखर कारखान्याच्या वतीने कंत्राटदारांचे काही छोटे आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी 3.50 कोटी रुपये दिले आहेत. जेणेकरुन दुष्काळग्रस्त 32 गावातील हजारो शेतकर्यांना सिंचन प्रकल्प वरदान ठरेल. कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी विजेचे कंत्राट मिळालेले युक्ता इलेक्ट्रिकल्सचे बसवेश्वर सलीमठ यांना धनादेशाच्या स्वरूपात पैसे सुपूर्द केले.

कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी सांगितले की, मी माझ्या गृह कार्यालयात खिलेगाव बसवेश्वर सिंचन प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली व पाटबंधारे अधिकारी व कंत्राटदारांकडून सर्वंकष माहिती घेतली व हा प्रकल्प मार्चच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण करावा. यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश दिले असून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते मार्चच्या पहिल्या आठवड्यात या प्रकल्पाचे उद्घाटन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी , कार्यकर्ते विनायक बागडी रामा सोद्दी , पाटबंधारे महामंडळाचे अधीक्षक अभियंता बी.आर.राठोड, बसवेश्वर पाटबंधारे प्रकल्प अभियंता के.रवी, गायत्री कन्स्ट्रक्शन्स वीरशेखर माने, डी.के.पवार, रमेश नीवलगी, डी.एन. मगदूम , शंकर दोड्डन्नावर , सचिन कांबळे, डॉ. धारप्पा होन्नगोल, संभा वीर आदींसह अनेकजण उपस्थित होते.

Tags: