आम्ही सत्ता करण्यासाठी आलेलो आहोत , विकास करण्यासाठी आलेलो नाही त्यामुळे तुम्ही विकासाबद्दल बोलू नका , लव्ह जिहाद बद्दल बोला अशी खरमरीत टीका , विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या यांनी रामदुर्गमध्ये काँग्रेसच्या प्रजाध्वनी यात्रेवेळी केली .

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रामदुर्ग मधील जनतेला , प्रजाध्वनी यात्रेवेळी संबोधीत केले . यावेळी त्यांनी राज्य तसेच केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला .
भाजप सरकार हे फक्त सत्ता गाजवण्यासाठी अधिकारात आले आहे . विकास करण्यासाठी नाही . त्यामुळे तुम्ही विकासाबद्दल बोलू नका , लव्ह जिहादबद्दल बोला . आम्ही जनतेच्या भावनांशी खेळण्यासाठी आलो आहोत असे भाजपवर टीकास्त्र सोडून सिद्धरामय्या यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बेंगळूर येथील भाषणातील मुद्द्यांचा चांगलाच समाचार घेतला . तळागाळातील जनतेच्या विकासासाठी , काँग्रेसचे धर्मनिरपेक्ष सरकार सत्तेत आणण्यासाठी पाठिंबा द्या असे आवाहन केले . त्याचप्रमाणे काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर जनतेला देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची माहिती त्यांनी यावेळी दिली .
प्रजाध्वनी यात्रेसाठी रामदुर्ग मध्ये आलेल्या माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या यांचे रामदुर्गच्या जनतेने जोरदार स्वागत केले . क्रेनद्वारे उस आणि फुलांचा वापर करून तयार केलेला अवाढव्य हार घालून त्यांचे रामदुर्गमध्ये स्वागत करण्यात आले. काँग्रेस नेते चिक्करेवण्णा यांच्या नेतृत्वाखाली हा तयार करण्यात आला होता . यावेळी सिध्दरामय्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली .
रामदुर्गच्या नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत केले. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे आगमन होताच जमावाने जल्लोष केला . यावेळी सिद्धरामय्या यांनी रामदुर्गमध्ये प्रजाध्वनी यात्रेदरम्यान रोड शो केला.
सिद्धरामय्या यांच्यासोबत माजी आमदार अशोक पट्टन आणि जमीर अहमद रोड शो वेळी उपस्थित होते .


Recent Comments