पावसाळ्यात नाल्यातून वाहून जाणारे पाणी वापरात यावे, या उद्देशाने नाल्यासाठी पुलवजा बंधारे बांधले जात आहेत. पाणी अडविल्याने या भागातील पाण्याची पातळी वाढणार आहे असे विधानसभेचे माजी मुख्य सचेतक महांतेश कवटगीमठ म्हणाले .

चिक्कोडी यादनवाडी गावात लघु पाटबंधारे व भूजल विकास विभागाने मंजूर केलेल्या विहिरीच्या, पुलवजा बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. चिक्कोडी तालुक्यातील नवलिहाळ, धुळगणवाडी, वाळकी , करोशी आणि यादनवाडी या गावांमध्ये पुलवजा बंधाऱ्याच्या उभारणीसाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अंकली गावातील खड्डा बुजवण्यासाठी, पुलवजा बंधाऱ्याच्या बांधकामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. खानापुर तालुक्यातील नेरसा गावातील विहिरीसाठी ,तसेच बंधाऱ्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सवदत्ती तालुक्यातील खड्डे बुजवण्यासाठी तसेच बंधाऱ्याची बांधकामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्य़ात मंजूर असलेल्या 7 पूलवजा बंधाऱ्यांची कामे येत्या मार्च महिन्यात पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी कंत्राटदारांना दिल्या.
यापूर्वीच चिक्कोडी तालुक्यातील जगनूर ते वाळकीपर्यंत 32 गावांमध्ये 33.55 कोटी रुपये खर्चून 32 विहिरी बांधल्या आहेत. यामुळे खंदकातून वाहून जाणारे पाणी पावसाळ्यात वाहून जाणारे आणि खराब होणारे पाणी थांबणार असल्याने त्याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
17 गावांच्या 19500 एकर क्षेत्राला सिंचनाची सुविधा देणाऱ्या महालक्ष्मी सिंचन प्रकल्पासाठी येत्या पंधरवड्यात निविदा मागवून कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ह्या बंधाऱ्यांच्या बांधण्यात आलेल्या विहिरींमध्ये पाणी थांबल्याने या भागातील भूजल पातळीत वाढ होणार असून, त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. लहान व अत्यल्प शेतकर्यांना ते खूप उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नंतर गावातील ज्येष्ठ सिद्दनगौडा पाटील यांनी महंतेश कवटगीमठ यांच्या विकास कामाचे कौतुक केले.
यावेळी , भाजप मंडल अध्यक्ष आप्पासाहेब चौगला, संजय पाटील, गिरीश पाटील, राहुल मेहता, किरण करगमवे, चिदानंद पाटील, इरागौडा पाटील, शमा हुवण्णा, सविता कडगमवे, सरलाबाई लट्टे, गिरीगौडा पाटील, सुरेश पाटील, विनायक पाटील, वीरेंद्र पाटील प्रकाश मगदुम्म आदी उपस्थित होते.


Recent Comments