Khanapur

आ. डाॅ.. अंजली निंबाळकर यांचा हाथ से हाथ जोडो कार्यक्रम

Share

हाथ से हाथ जोडो कार्यक्रमात आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांनी स्वतः लोकांसमोर जाऊन त्यांनी केलेल्या कामाची खात्री पटवून दिली.

काँग्रेसच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात हात से हाथ जोडो कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधून आमदार डॉ.अंजली निंबाळकर छोट्या पत्रकाद्वारे आपण पाच वर्षात केलेल्या कामांचे स्वरुप जनतेला दाखवून देत आहेत.या पत्रकांमध्ये त्यांनी केलेल्या विकासकामांची यादी आहे.

पंचायत, आणि जनतेमध्ये ही पत्रके वितरीत करुन पुन्हा एकदा आर्शिवाद देऊन निवडून आणण्याची विनंती करत आहेत.आपल्या पाच वर्षांच्या सेवेत प्रत्येक गावाला किती अनुदान दिले आणि गावांचा विकास केला, असे आमदार अंजलीताई निंबाळकर सांगत आहेत.

ग्रामीण भागातील जनतेला मुलभूत सुविधा देऊन त्याचा किती प्रमाणात फायद झाला आहे. लोकनेत्या म्हणून त्या जनतेत सामील झाल्या असून त्यांनी केलेल्या विकासकामांची यादी पाहून लोकही त्यांना पाठींबा दर्शवत आहेत

खानापुरा तालुक्यातील पारीशवाड, देवळत्ती, कमसीनकोप्प यासह इतर गावांना भेटी देऊन आमदार अंजली निंबाळकर तालुक्यातील प्रत्येक गावातील लोकांची घरोघरी भेट देणार आहेत.

Tags: