घराचे छत अंगावर कोसळून वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्यातील करिकट्टी गावात घडली आहे . .

शांतव्वा शिवमूर्तय्या हिरेमठ (वय 60) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या दुर्दैवी वृद्ध महिलेचे नाव आहे. मंगळवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराचे छत कोसळल्याने त्या ढिगाऱ्याखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.


Recent Comments