Agriculture

सिदगौडा मोदगी यांना धमक्यांचा निषेधार्थ निदर्शने

Share

भारतीय कृषक समाजाचे राज्य अध्यक्ष सिदगौडा मोदगी यांना कोंडून घालून अत्याचार आणि जीवे मारण्याच्या धमकी दिल्याच्या निषेधार्थ शेतकरी, कामगार व अन्य संघटनांनी बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले.

मलप्रभा सहकारी साखर कारखान्यातील सिदगौडा मोदगी यांच्यावर हल्ला करण्यासाठी खासगी व्यक्तीशी हातमिळवणी करणाऱ्या व्यवस्थापकीय संचालक आणि व्यवस्थापन मंडळाच्या सदस्यांना तत्काळ बडतर्फ करून जिल्हा प्रशासनाने योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, जिवे मारण्याची धमकी देणार्‍या आणि प्राणघातक हल्ला करणार्‍या बदमाशांवर कारवाई अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी निदर्शकांना उद्देशून बोलताना सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर यांनी, मोदगी यांच्यावरील हल्याचा निषेध केला. कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकाच्या गैरहजेरीत जाणीवपूर्वक मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. गेली अनेक वर्षे ते शेतकरी समर्थक लढ्यात सक्रियपणे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत आहेत. व्यवस्थापन मंडळाच्या सदस्यांशी हातमिळवणी करून, आपल्या अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या व्यवस्थापकीय संचालकाला तत्काळ बडतर्फ करा, अशी मागणी केली. जिल्हा प्रशासनाने गैरप्रकार करणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अन्यथा उग्र आंदोलन छेडू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर यांनी यावेळी दिला.

यावेळी भारतीय कृषक समाजाचे पदाधिकारी, सदस्य, शेतकरी आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

Tags: