Belagavi

मांगूर गावात मराठा समाज बांधवाची बैठक

Share

निपाणी तालुक्यातील मांगूर गावात मराठा समाज बांधवाच्या झालेल्या बैठकीत मराठा समाजाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांची एकमताने निवड करण्यात आली.

प्रारंभी जिजामाता यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर अध्यक्षपदी नंदकुमार पांडुरंग राऊत, उपाध्यक्षपदी बाळासाहेब गुंडू, कनवाड आणि सचिवपदी संतोष मधुकर बेलवले यांची निवड झाली. संतोष बेलावले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी मराठा समाजातील मान्यवर उपस्थित होते.

Tags: