मलप्रभा नदीचे उगमस्थान असलेल्या कणकुंबी माऊली देवस्थानच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला आहे. यानिमित्त खानापूरच्या आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी देवीचे दर्शन घेऊन धार्मिक विधी केले.

होय, खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीचे उगमस्थान असलेल्या कणकुंबी गावचे ग्रामदैवत श्री माऊली देवीची जत्रा तब्बल 14 वर्षानंतर होत आहे. या जत्रेच्या निमित्ताने आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी देवीच्या पालखी वाहून श्रद्धा-भक्ती अर्पण केली. त्यांनी देवीची पूजा करून धार्मिक विधी पार पाडले. यावेळी सुरेश जाधव यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments