भाजप नेते व महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर यांनी कुशीकोप्प गावात गवत गंज्याना आग लागल्याने नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची मदत केली.

खानापूर तालुक्यातील नागरगाळी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कुशीकोप्पा गावातील गवळीवाड्यात सुमारे पाच ट्रॅक्टर भरतील एवढ्या चाऱ्याला आग लागून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्याशिवाय जनावराना चाराटंचाई भासणार आहे. त्यासाठी भाजप नेते व महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हालगेकर यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
विठल हलगेकर यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. त्यांच्या अनुपस्थितीत ही रक्कम गवळीवाड्यातील नुकसानग्रस्त व्यक्तीला देण्यात आली. यावेळी बोलताना भरमाणी पाटील यांनी सांगितले की, आमच्या हिंदू संस्कृतीत आम्ही गोमातेची पूजा करतो. अचानक गवत गंज्याना आग लागून गायी-वासरांना चाऱ्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत दानशूर आणि राजकीय व्यक्तींनी यावे. पुढे करा आणि मदतीचा हात पुढे करा असे आवाहन केले.


Recent Comments