Kagawad

जुगूळमध्ये वेदांत केसरी श्री मल्लिकार्जुन गुरुदेवाश्रमाचे भूमीपूजन

Share

कागवाड तालुक्यातील जुगूळ गावात विजापूरच्या ज्ञानयोगाश्रमाचे अध्यक्ष बसवलिंग स्वामीजी यांच्या दिव्य उपस्थितीत वेदांत केसरी श्री मल्लिकार्जुन गुरुदेवाश्रमाची पायाभरणी करण्यात आली.
शनिवारी मल्लिकार्जुन गुरुदेवाश्रमचे उपाध्यक्ष गुरुगौडा पाटील आणि सचिव कुमार मिनचे यांनी स्वखर्चाने खरेदी केलेल्या एक एकर जमिनीत चार कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या आश्रम आणि समुदाय भवनाचे भूमीपूजन करण्यात आले.

समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना विजापूर ज्ञानयोगाश्रमाचे बसवलिंग स्वामीजी म्हणाले, वेदांत केसरी श्री मल्लिकार्जुन महास्वामी 1951 मध्ये कृष्णा नदीच्या काठी जुगूळ गावात येऊन त्यांनी येथील भक्तांना अध्यात्माचा उपदेश केला होता. जुगूळमध्ये आश्रम स्थापन करण्याचे त्यांनी ठरवले होते. मात्र, त्यावेळी ते जमले नाही. चालते-बोलते दैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर स्वामीजींनी आपल्या गुरूंची इच्छा येथील भक्तांसमोर ठेवली होती. स्वामीजींचे भक्त गुरूगौडा पाटील व कुमार मिनचे यांनी स्वखर्चाने एक एकर जागा खरेदी करून या ठिकाणी आश्रम इमारतीचे भूमिपूजन केले. हे पूर्ण करण्यासाठी सर्व हितचिंतकांनी हातभार लावावा.

कागवाड मतदारसंघाचे माजी आमदार मोहनराव शहा म्हणाले, जुगूळ गावात वेदांत केसरी मल्लिकार्जुन स्वामीजींच्या नावाने आश्रम बांधण्याचा निर्णय घेण्यात आला हे योग्यच आहे. सिद्धेश्वर महास्वामींच्या उपस्थितीत मी अनेकवेळा कार्यक्रमातून आलो आहे. माझ्यातील बदल सिद्धेश्वर स्वामीजींच्या प्रेरणेने झाला आहे असे मी मानतो. या आश्रमाच्या उभारणीसाठी या सर्वांनी मनापासून आणि पैशाने हातभार लावल्याचे ते म्हणाले.

जुगूळ मल्लिकार्जुन गुरुदेवाश्रमचे अध्यक्ष हर्षानंद स्वामीजी म्हणाले की, सिद्धेश्वर महास्वामी यांनी जुगूळ गावात आश्रम बांधण्याबाबत विचारणा केली होती. मात्र, योग आला नाही. आता आमच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष गुरुगौडा पाटील आणि कुमार मिनचे यांची जमीन विकत घेतली आहे. येथे आश्रम बांधण्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य केले आहे. बालागाव गुरुदेवाश्रमाचे आत्मानंद स्वामीजी, सदलगा गीताश्रमाचे श्रद्धानंद स्वामीजी, टाकळी-बोलवाड आश्रमाचे शिवानंद स्वामीजी, कृष्णा-कित्तूर गुरुदेवाश्रमाचे बसवेश्वर स्वामीजी, सिंदगी गुरुदेवाश्रमाचे शांतानंद स्वामीजी यांनी दिव्य उपस्थिती लावून आशीर्वाद दिले.

कुमार मिनचे दाम्पत्याच्या हस्ते पूजा-विधीचा कार्यक्रम पार पडला. श्रीनिवास पाटील यांनी “श्रीमंत पाटील फाऊंडेशन” च्या वतीने जमीन दान करणाऱ्या गुरुगौडा पाटील आणि कुमार मिनचे यांच्या धर्ममाता यांचा गौरव केला. सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती

माजी आमदार राजू कागे, चिदानंद कोरे साखर कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे, निमंत्रक अण्णासाहेब पाटील, एस. एम. सन्नक्की, भाजप कागवाड शाखा अध्यक्ष तमन्ना परशेट्टी, अरुण गणेशवाडी, एस. एस. तुगशेट्टी, सातगौडा पाटील, श्रीकांत देसाई, ऍड. भास्कर पाटील, डॉ. डी. बी. चौगुले, दादा पाटील, एम. बी. कुलकर्णी, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

Tags: