latest

तुर्कीनंतर आता भारतातही विनाशकारी भूकंप? ‘त्या’ वैज्ञानिकाची धक्कादायक भविष्यवाणी

Share

तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे हजारो घरे आणि इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. या भूकंपामुळे सुमारे 21,000 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपाबाबत भूगर्भशास्त्रज्ञाने आधीच भाकित केलं होतं. त्याचं संशोधकाने आता भारताबद्दलही धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. डच भूगर्भशास्त्रज्ञ फ्रँक हूगरबीट्स यांनी आधीच तुर्की आणि सीरियातील भूकंपाबाबत भाकित केल्याचं सांगितलं जात आहे.

डच संशोधक आणि भूगर्भशास्त्रज्ञ फ्रँक हूगरबीट्स यांनी तुर्की आणि सीरियातील भूकंपाबद्दल भाकित केलं होतं. हूगरबीट्स यांनी भविष्यवाणी केली होती की, तुर्कीमध्ये विनाशकारी भूकंप होईल. आता याच संशोधकाने भारताबद्दल धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. भूकंपाच्या यादीत तुर्की आणि सीरियानंतर भारत आणि पाकिस्तानचा क्रमांक असल्याचं त्यांनी भाकित केलं आहे. डच भूगर्भशास्त्रज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, आता आशियाई देशांना भूकंपाचा झटका बसणार आहे.
तुर्कीनंतर आता भारतातही विनाशकारी भूकंप

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये फ्रँक हूगरबीट्झ यांनी आणखी एका विनाशकारी भूकंपाची भविष्यवाणी केली आहे. आशियाई देशांना तुर्कस्तानसारखा भूकंप किंवा नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागेल, असे हूगरबीट्सने म्हटले आहे. त्यांच्या मते, पुढील भूकंप अफगाणिस्तानपासून सुरु होईल आणि अखेरीस पाकिस्तान आणि भारत ओलांडल्यानंतर हिंद महासागरात संपेल.

Tags: