एका वृद्ध महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील खडकलाट गावात घडली आहे.

अवूताई भरमा गावडे (वय 83) या वृद्ध महिलेने आत्महत्या केल्याची माहिती आहे. मृत अवूताई गावडे या मनोविकाराने त्रस्त होत्या, असे सांगण्यात येत आहे. रात्री त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. खडकलाट पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. या प्रकरणी खडकलाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments