तुर्किये आणि सीरिया या दोन्ही देशांमध्ये भूकंपांनी हाहाकार माजवला आहे. भूकंपातील मृतांची संख्या आता 15,000 च्या पुढे गेली आहे. यातच सोशल मीडियावर एक हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये एक सात वर्षांची सीरियन मुलगी तिच्या लहान भावाला ढिगाऱ्यातून वाचवताना दिसत आहे. ती ढिगाऱ्याखाली दबली गेली असली तरी ती आपल्या भावाचे रक्षण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातून भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम आपुलकी आणि जबाबदारी दिसून येत आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) चे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयसस यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, ‘मी या धाडसी मुलीचे खूप कौतुक करतो. संयुक्त राष्ट्रांचे प्रतिनिधी मोहम्मद सफा यांनीही हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. त्यांनी ट्विट केले की, ‘7 वर्षांची मुलगी तिच्या लहान भावाचे संरक्षण करत आहे.
ते 17 तास ढिगाऱ्याखाली दबले आणि सुरक्षित आहेत. हा व्हिडीओ कोणी शेअर करताना मला दिसत नाही, जर त्यांना काही झाले असते तर प्रत्येकाने तो शेअर केला असता’.
लहान भावंडे म्हणजे भांडखोर, एकमेकांना मारणारी किंवा खाऊसाठी रडणारी आपण पाहिली असतील. भाऊ-बहिणीमध्ये सतत किरकोळ कारणावरुन अनेक भांडणही होत असतात. मात्र, भाऊ-बहिणीमध्ये कितीही वाद असले तरीदेखील त्यांच्या नात्यामधील प्रेम हे सर्व नात्यांपेक्षा मोठं असतं हेच या घटनेवरून अधोरेखित झालं आहे


Recent Comments