बेळगाव देशातील एक प्रमुख शहर आहे. येथून देशातील अन्य शहरांना पूर्ववत विमानसेवा सुरु करावी अशी मागणी खासदार इरण्णा कडाडी यांनी राज्यसभेत केली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात शून्य प्रहरात खासदार इरण्णा कडाडी यांनी राज्यसभेत बेळगावच्या खंडित विमानसेवेवर आवाज उठवला. ते म्हणाले, बेळगावहून १९४२मध्ये तत्कालीन ब्रिटिश रॉयल एअर फोर्सने प्रथम विमानसेवा सुरु केली होती.
सध्या देशातील १३ प्रमुख शहरांना येथून विमानसेवा सुरु आहे. त्याला गेल्या काही वर्षात चांगला प्रतिसादही मिळतो आहे. परंतु उडान योजनेत चॅम्पियन अवॉर्डही मिळाला आहे. पण उडान योजनेत साह्य मिळणे बंद झाल्याने स्पाईसजेट, ट्रू जेट, अलायन्स आदी हवाई वाहतूक कंपन्यांनी अनेक शहरांची विमानसेवा बंद केली आहे. त्यामुळे सरकारने बेळगाववरुन देशातील प्रमुख शहरांना विमानसेवा पूर्ववत सुरु करण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी खा. कडाडी यांनी केली.


Recent Comments