कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांच्या आमदारनिधीतून , शेडबाळ स्टेशन नगरात बांधण्यात आलेल्या शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या प्लांटचा शुभारंभ तसेच शीतलनाथ नगर व खराडे मळ्यातील डांबरी रस्त्याच्या कामकाजाचा शुभारंभ , आमदारपुत्र तसेच केंपवाड साखर कारखान्याचे एम.डी, श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला .

शेडाबाळ स्थानकात नव्याने बांधण्यात आलेल्या स्वच्छ पेयजल प्रकल्पाचे उद्घाटन श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महांतेश कोल्लापुरे यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीत पार पडले.

शहरातील सांडपाणी शुद्ध करून ते शेतीसाठी वापरण्यासाठी २५ लाख. रु . च्या खर्चातून , एसटीपी युनिट बांधण्यात येत आहे . श्रीनिवास पाटील, अधिकारी व सदस्यांनी एसटीपी युनिटच्या कामकाजाची पाहणी केली .
शीतलनाथ नगर ते कागवाडच्या मुख्य रस्त्यापर्यंत 40 लाख रु . च्या निधीतून तसेच रस्त्याच्या कामासाठीआणि कागवाड मुख्य रस्ता ते खराडे मळ्यापर्यंत सुमारे 20 लाख रुपये खर्च करून रस्त्याचे काम सुरू केले.
कामाच्या उद्घाटनानंतर भाजप पक्षनेते व वकील प्रवीण केंपवडे यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून येथील काम करण्याची मागणी केली जात होती. आमदार श्रीमंत पाटील यांनी ही बाब लक्षात घेऊन आमदारांच्या विशेष अनुदानातून 70 लाख रुपयांच्या निधीतून हे कामकाज करण्यात येत आहे . त्यामुळे येथील जनतेच्या वतीने आमदारांचे आभार मानू इच्छितो. (बाइट)
नगरपंचायत प्रमुख महंतेश कोल्लापुरे, सदस्य रेणुका होनकांबळे, मारुती मकन्नवर, सचिन जगताप, बाबू ऐनापुरे, किरण यंदगौडर, सचिन कवटगे, यल्लाप्पा यदूरे, संदीप साळुंके, सचिन पाटील, प्रवीण पाटील, संजय घेन्नापगोळ, आश्रमनगरचे संजय घेन्नाराम पाटील, आश्रमनगर येथील ग्रामस्थ उपस्थित होते. , अप्प्या हिरेमठ, हनुमंत चोळके, रमेश खराडे, ठेकेदार एम.बी.पाटीला, उत्कर्ष पाटील, संतोष माळी, मल्लिकार्जुन कुंभार, सचिन वसावडे आदींसह अनेकांची उपस्थिती होती.


Recent Comments