Belagavi

रमेश जारकीहोळी डीके शिवकुमार यांचा वैयक्तिक वाद :लक्ष्मण सवदी यांची प्रतिक्रिया

Share

रमेश जारकीहोळी डीके शिवकुमार यांचा वैयक्तिक वाद आहे . हे मुद्दे भाजप किंवा काँग्रेस पक्षाशी संबंधित नाहीत अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण सवदी यांनी दिली .

रमेश जारकीहोळी सीडी प्रकरणासंबंधी भाजप प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण सवदी यांची अथणी येथे प्रतिक्रिया दिली . यापूर्वीच बालचंद्र जारकीहोळी सतीश जारकीहोळी यांनी निवेदन दिले आहे.

ती दोन विधाने तुमच्या लक्षात आली असतील. रमेश जारकीहोळी डीके शिवकुमार यांचा वैयक्तिक वाद आहे . हे मुद्दे भाजप किंवा काँग्रेस पक्षाशी संबंधित नाहीत.यावर भाष्य करणे मला योग्य नाही.

 

सीबीआय तपासासाठी सीडी प्रकरण हा कळीचा मुद्दा आहे. सीबीआयच्या तपासाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. अशी प्रतिक्रिया लक्ष्मण सवदी यांनी अथणीमध्ये दिली आहे .

Tags: