लोकशाहीतील सरकारमध्ये दोनदा मुख्यमंत्री झालेल्या कुमारस्वामींच्या तोंडी जातीभेदाची भाषा शोभत नाही . असा संताप बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी व्यक्त केला
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कि , जात-पात, वर्ण, या पलीकडे जाऊन सर्वसामान्यांची सेवा करणारे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हे भाजपमधील आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत.
राजकारणात टीका होणे ही सामान्य गोष्ट आहे पण जातीचा गैरवापर हा राजकारणासाठी करणे योग्य नाही. या सर्वांच्या पलीकडे लोकप्रतिनिधींनी पाहिले पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून तोंडाला येईल ते बडबडून , इतरांचे समाधान करण्याच्या हेतूने जातीच्या नावाने बोलणे योग्य नाही. सत्तेचे पद उपभोगलेल्या व्यक्तीने इतक्या खालच्या पातळीवर जाऊ नये. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे मोदीजी यांच्याशी चांगले संबंध असण्यासोबतच भाजपमधील प्रभावी मंत्री म्हणून सर्व नियोजन सुविधा राज्यात आणण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यांना ब्राह्मण जातीपुरते मर्यादित करणाऱ्या माजी मुख्यमंत्री कुमार स्वामी यांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.
त्यांनी आपले शब्द तात्काळ मागे घेऊन माफी मागावी अन्यथा आगामी काळात तीव्र संघर्षाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष मल्लिकार्जुन , माध्यम समन्वयक एफ एस सिद्धनगौडा, जिल्हा प्रवक्ते संजय कांची, जिल्हा सोशल मीडिया समन्वयक नितीन चौगले, वीरभद्रय्या पुजार उपस्थित होते.


Recent Comments