अथणी मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी कोट्यवधी रुपये आणून ग्रामीण भागाचा विकास करणे याला आपले पहिले प्राधान्य आहे असे अथणीचे आमदार महेश कुमठळ्ळी यांनी सांगितले.

अथणी तालुक्यातील चिक्कट्टी गावात 51 लाख रुपये खर्चातून जल जीवन मिशनचे काम, सवदी गावात 10 लाख रुपये खर्चाचे दर्गा धर्मशाळा भवनाचे काम, 14 लाख रुपये खर्चातून सवदी दर्गा उर्दू शाळा खोलीचे बांधकाम, सवदी ते सवदी आर. सी. पर्यंत 1 कोटी 25 लाख रुपये खर्चातून आर.सी. रस्त्याचे काम, सवदी गावात 1 कोटी 60 लाख रुपये खर्चून करसिद्दन रस्त्याचे काम, 1 कोटी 60 लाख रुपये खर्चातून सवदी गाव ते महिषवाडगी (धरण) रस्त्याचे काम, 1 कोटी 60 लाख रुपये खर्चातून सवदी ते कोडगनूर रस्त्याचे काम, सवदी गावात 2 कोटी 10 लाख रुपये खर्चून बळवाड रस्त्याचे काम, सवदी कन्नड प्राथमिक शाळेला 14 लाख रुपये खर्चून 1 खोलीचे काम, सवदी येथे जलजीवन मिशन प्रकल्पांतर्गत 1 कोटी 36 लाख रुपये खर्चून पिण्याच्या पाणी पुरवठ्याचे काम आदी कामांचे भूमिपूजन केल्यावर ते बोलत होते.
सवदी व दर्गा ही गावे कृष्णा नदीच्या काठावर असल्याने येथील नदीच्या पाण्याच्या प्रवाहाने शेतातील सुपीक माती वाहून जाऊ नये यासाठी मी विशेष प्रयत्न केले आहेत. तेथे संरक्षण भिंत बांधण्यासाठी 28.50 कोटी रुपयांचा निधी मी मंजूर करून आणला आहे. काही दिवसात काम सुरू करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईन, असे त्यांनी सांगितले.
यावेळी अधिकारी वीरण्णा वाली, नेते निंगाप्पा नंदेश्वर, डी.बी.ठक्कनवर, शिवकुमार पाटील, हुसेन मुल्ला, संगाप्पा आवटी, राजूगौडा पाटील, निंगाप्पा सारवाड, संगाप्पा पाटील, गुरुलिंग घाडी, ठेकेदार मुरगेप्पा नाईक, बसवराज दरुर, रमेश धुमाळे, शिवानंद संक्रट्टी, अर्जुन नाईक, ए. के. पाटील, विजय लक्केगौडर, अक्षय कुलकर्णी आदी उपस्थित होते.


Recent Comments