Belagavi

सरकारी शाळा महाविद्यालयांचा सुधारावा दर्जा : माजी खा . रमेश कत्ती

Share

सरकारी शाळा, महाविद्यालयातील तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, असे माजी खासदार रमेश कत्ती म्हणाले .

 

हुक्केरी शहरातील शासकीय पदवीपूर्व महाविद्यालयात आयोजित समारंभाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून ते म्हणाले की, राज्यातील नूतन प्रकल्पांची घोषणा करून पायाभरणी करण्यापेक्षा विकास करून आपल्या विद्यार्थ्यांना आधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्याची गरज आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची नियुक्ती आणि इमारत यांसारखी कामे करून द्यायला हवीत .

यावेळी व्यासपीठावर निवृत्त प्राचार्य पी जी कोन्नूर, बी.एस. मगदुम्मा, प्राचार्य एमएन नायक, वीरेश पाटील, राजू मुन्नोळी , मुन्ना कलावंत उपस्थित होते.
नंतर महाविद्यालय विकास मंडळातर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शासकीय पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: