Belagavi

मोदेकोप्पमध्ये यल्लम्मा देवीच्या 35 भाविकांना अन्नातून विषबाधा

Share

खानापूर तालुक्यातील मोदेकोप्प गावातून यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या 35 भाविकांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्यावर खानापूर सार्वजनिक रुग्णालयात उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली.

खानापूर तालुक्यातील मोदेकोप्प गावातून 35 भाविक यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. तेथे दर्शन घेऊन जेवण उरकून गावाकडे परतत असताना काहींना उलट्या व पोटदुखीचा त्रास होऊ लागला. गावात परतल्यानंतरही त्यांना पुन्हा प्रकृतीचा त्रास होत असल्याने खानापूर सार्वजनिक रूग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, भाजप नेते व महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर यांनी याची माहिती मिळताच त्वरित खानापूर सरकारी रूग्णालयात जाऊन ग्रामस्थांच्या प्रकृतीची विचारपूस केली व आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून सर्वजण स्वस्थ असल्याची माहिती घेतली. यावेळी लैला शुगर्स कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक सदानंद पाटील आदी उपस्थित होते.

Tags: