बेंगळूर येथे केलेल्या दहा दिवसांच्या धरणे आंदोलनानंतर , राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्याने , अंगणवाडी सेविकांनी आपला आनंद व्यक्त केला .

बेळगाव शहरातील चन्नमा सर्कलमध्ये जमून बेळगावमधील अंगणवाडी सेविकांनी आनंदोत्सव साजरा केला . ग्रॅच्युइटीसह अंगणवाडी सेविकांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्या राज्य सरकारने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे . अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या भविष्यासाठी ग्रॅच्युइटीचे पैसे, विविध सेवा भत्ते आणि पायाभूत सुविधा देण्याचे राज्य सरकारने मान्य केले आहे. वित्त विभागाने याबाबत लेखी आदेश जारी केला आहे.
तसेच अंगणवाडी केंद्रांमधील शिक्षणाची वेळ बदलून सकाळी 10 ते दुपारी 1 अशी करण्यात आली आहे. अंगणवाडी केंद्रांमध्ये नवीन शैक्षणिक धोरण जाहीर करावे यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या अनुषंगाने राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या बेळगाव जिल्हा युनिटच्या नेतृत्वात अंगणवाडी सेविकांनी विजयाचा नारा देत आणि एकमेकांना मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.
शहरातील राणी चन्नम्मा सर्कलमध्ये अंगणवाडी सेविकांनी फटाक्यांची आतषबाजी, केक कापून आणि एकमेकांना मिठाईचे वाटप केले.
यावेळी आपली मराठीशी बोलताना अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्या मान्य झाल्याचा आनंद व्यक्त केला . यासाठी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारचे आभार मानले
यावेळी , मोठ्या संख्येनें अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या .


Recent Comments