Belagavi

बेळगावच्या महापौरपदी शोभा सोमनाचे; रेश्मा पाटील उपमहापौर

Share

बेळगावच्या महापौरपदी शोभा सोमनाचे तर उपमहापौरपदी रेश्मा पाटील यांची निवड झाली आहे.

 

महापालिका सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजपने अपेक्षेप्रमाणे दोन्ही पदे पटकावली आहेत.

निवडीनंतर भाजप राज्य प्रवक्ते ऍड. एम. बी. जिरली आणि आ. अभय पाटील यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.

भाजप सर्व भाषिकांना सोबत घेऊन जाणारा राष्ट्रीय पक्ष आहे. बेळगावच्या विकासासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

Tags:

citycorporation election mayor