Belagavi

महापौर , उपमहापौर पदासाठी इच्छुक उमेदवारांचे स्वीकारले अर्ज

Share

बेळगावच्या महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी महापालिकेत भाजप नेत्यांसह , महापौर , उपमहापौर पदासाठी इच्छुक उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांचे आगमन झाले आहे .

 

बेळगाव निवडणूक प्रभारी निर्मलकुमार सुराणा , आमदार अभय पाटील, अनिल बेनके, भाजप प्रवक्ते एम.बी.जिरली यांचे आगमन देखील महापालिकेत झाले आहे .
भाजप नगरसेविका सारिका पाटील, शोभा सोमण्णाचे, माधवी राघोचे, नेत्रावती भागवत यांचे अर्ज स्वीकारले. चारही जणांकडून नगराध्यक्षपदासाठी अर्ज स्वीकारले

उपमहापौरपदासाठी भाजपकडून रेश्मा पाटील, एमईएसकडून वैशाली भातकांडे , एमईएसकडून अस्मिता पाटील यांनी अर्ज स्वीकारले.

नगराध्यक्षपदासाठी भाजपमध्ये तीव्र स्पर्धा सुरु आहे .

Tags: