Belagavi

बेळगावात रामकृष्ण मिशनच्या भावैक्यता मंदिराचा वर्धापन दिन

Share

बेळगावातील रामकृष्ण मिशन आश्रमाच्या भावैक्यता मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्वामी विवेकानंद आणि अध्यात्मिक जीवन यावर मान्यवरांची व्याख्याने आज पार पडली.

बेळगावातील किल्ला परिसरातील श्री रामकृष्ण मिशन आश्रमाच्या भावैक्यता मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्तविविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त आज विविध स्वामीजींची अध्यात्म आणि स्वामी विवेकानंद यांचे जीवन यावर प्रबोधनपर व्याख्याने झाली.

यावेळी बोलताना निडसोशी मठाचे पंचम शिवलिंगेश्वर स्वामीजी म्हणाले, स्वामी विवेकानंद प्रतिभावान संन्यासी होते. त्यांनी मानवी जीवनाला परिपूर्ण करणारी मौल्यवान विचार मौक्तिके समाजाला दिली. अध्यात्म हा मानवी जीवनाचा पाया आहे हे त्यांनी ठासून सांगितले असे स्वामीजी म्हणाले.

यावेळी बोलताना बेंगळूरच्या रामकृष्ण मिशनचे स्वामी नित्यस्थानंदजी म्हणाले, स्वामी विवेकानंदांनी जीवन हाच संघर्ष आहे, आणि संघर्ष हाच जीवन आहे असा संदेश दिल्याचे सांगून, ध्येयप्राप्तीसाठी युवकांनी संघर्ष करत राहण्याचे आवाहन केले.

स्वामी मंगलनाथ महाराज म्हणाले, भगवंताचे नामस्मरण करण्यापेक्षा श्रेष्ठ दुसरे काहीही नाही. जर आपण देवावर विश्वास ठेवून जगलो तर तो आपल्याला कधीही सोडू शकत नाही. आपण देवासोबत घट्ट नाते ठेवले पाहिजे. त्याचबरोबर उद्दिष्टप्राप्तीसाठी प्रयत्नरत राहिले पाहिजे असे सांगितले.

याप्रसंगी विविध शाळांचे शिक्षक, विध्यार्थी, निमंत्रित तसेच रामकृष्ण मिशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Tags: