Kagawad

बाल मंदिराचा 70 वा वर्धापन दिन

Share

कागवाड तालुक्यातील उगार खुर्द येथील उगार महिला मंडळाच्या वतीने प्रारंभ केलेल्या बाल मंदिराचा 70 वा वर्धापन दिन विविध अर्थपूर्ण कार्यक्रमाने साजरा करण्यात आला .

उगार येथे बाल मंदिराचा 70 वा वर्धापन दिन कार्यक्रम उगार महिला मंडळाचे अध्यक्ष स्मिताताई शिरगावकर व सर्व संचालकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील जयंत पाटील बाल संस्कार संस्थेच्या बालतज्ञ संगीता शहा यांचे मोलाचे मार्गदर्शन यावेळी लाभले.

उगार बाल मंदिर गेल्या 70 वर्षांपासून उगार साखर कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मुलांना उत्तम संस्कार येथे करण्यात येते. यामुळे येथे अध्ययन केलेले विद्यार्थी जर्मन व इतर देशामध्ये नामांकित कंपनीमध्ये मुख्य अधिकारी म्हणून सेवेत आहेत त्यापैकी केतन भट, अपूर्वा जोशी, डॉक्टर संगीता जोग, अभय देशपांडे, चिन्मय नाईक , साखर कारखान्याचे एमडी चंदन शिरगावकर उद्योगपती म्हणून काम पाहत आहेत. येथे इंग्लिश भाषेबरोबर संस्कारयुक्त भाषेतून शिक्षण दिले जाते. आई-वडिल मुलांना केवळ मोबाईल मध्ये गुंतवून ठेवतात त्यांच्यामुळे त्यांच्या मेंदूवर विपरीत परिणाम होत आहे, याकरिता आई-वडिलांनी विशेष पथ्य पाळावे व मुलांना मोबाईल पासून दूर ठेवून उत्तम संस्कार करण्याचा प्रयत्न करावा. असा मौलिक विचार संगीता शहा यांनी व्यक्त केला.

उगार महिला मंडळाच्या अध्यक्षा स्मिताताई प्रफुल शिरगावकर बोलताना म्हणाल्या उगार महिला मंडळाच्या वतीने गेल्या 70 वर्षापासून कारखान्याच्या कामगारांच्या मुलांना योग्य मार्गदर्शन करीत त्यांना संस्कारयुक्त शिक्षण दिले जाते, हा उपक्रम निरंतरपणे आम्ही राबवत आहोत, हे या बाल मंदिराच्या सर्व शिक्षकांचे श्रेय आहेत, यानंतरही अशीच परंपरा ठेवणार आहोत पालकांना विनंती करताना त्या म्हणाल्या , इंग्लिश भाषा व्यवहारामध्ये असू दे मात्र संसारासाठी मातृभाषेची गरज आहे असे ते सांगितले.

या कार्यक्रमांमध्ये बाल मंदिरामध्ये गेल्या 30 वर्षापासून अध्ययन केलेल्या व निवृत्त झालेल्या आदर्श शिक्षिका वसुधा बर्वे, सुनंदा कुलकर्णी, संगीता कुलकर्णी, मोहिनी पुजारी, यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमांमध्ये महिला मंडळाच्या अध्यक्ष स्मिताताई शिरगावकर , गीतांजली शिरगावकर, राधिकाताई शिरगावकर, गौरीताई शिरगावकर, मुख्याध्यापिका मंगला दिवाण, प्रफुल शिरगावकर महिला मंडळाच्या सेक्रेटरी अनिता पुजारी, शितल सप्रे, धनश्री शिंदे, नंदिनी फराकट्टे यासह अन्य सदस्यांनी दोन दिवसाच्या समारंभ यशस्वीरित्या पार पाडले.

Tags: