आपण सर्वांनी सर्व धर्म आणि धर्मीयांवर कोणताही भेदभाव न करता प्रेम केले आणि आपण सर्व भारतमातेची लेकरे आहोत या भावनेने, बंधुभावाने जगल्याने जीवन सुखी होईल, असे मत विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी व्यक्त केले.

खानापूर तालुक्यातील सुक्षेत्र चिक्कमुनवळ्ळी येथील आरूढ मठात आयोजित सर्वधर्म समभाव संमेलनात सहभागी होऊन सर्व धर्मगुरूंचे आशीर्वाद घेत त्यांनी संमेलनाला संबोधित केले.
सर्व जातींसाठी नंदनवन असलेले मठ-मंदिरे आज समाजाला एक चांगला संदेश देत आहेत. सण आणि उत्सव नेहमीच अध्यात्माचे प्रतीक म्हणून उदयास येत आहेत.

मी अनेक कुटुंबाना गुढीपाडवा, होळी, ख्रिसमसच्या भेटवस्तू आणि रमजानच्या खीरची देवाणघेवाण करताना पाहिले आहेत. काही वेळा मी सुद्धा सहभागी झालो आहे, असा आपला अनुभव त्यांनी सांगितला.
यावेळी शिरहट्टीचे श्री जगद्गुरू फकीर डिंगळेश्वर महास्वामी, चिक्कमुनवळ्ळीचे श्री दिव्यचेतन शिवपुत्र महास्वामी, कोळीगुड्ड येथील श्री स्वरूपानंद महास्वामी, हुलीकट्टीचे परमपूज्य श्री लिंगानंद महास्वामी, कोचेरीचे श्री कलमेश्वर महास्वामी व इतर स्वामीजी यावेळी उपस्थित होते.


Recent Comments