रात्रीच्या वेळी शेतात बसवलेल्या बकऱ्यांच्या कळपावर लांडग्यांनी केलेल्या हल्ल्यात कळपातील सुमारे 25 बकऱ्यांचा मृत्यू झाला. ही घटना बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील बोम्मनाळ गावात शुक्रवारी रात्री घडली.

मल्लाप्पा हिरेकुडी यांच्या मालकीची ही बकरी आहेत. बोम्मनाळ गावातील रबकवी यांच्या शेतात त्यांचा कळप बसविण्यात आला होता. कळपाचा मालक मल्लाप्पा जेवणासाठी गेला असताना लांडग्यांच्या कळपाने त्यांच्यावर हल्ला करून 25 बकऱ्यांचा फडशा पाडला. या घटनेत मेंढपाळ मल्लाप्पा यांचे मोठे नुकसान झाले आहे.


Recent Comments