Banglore

अर्थसंकल्पातील सर्व योजनांतून कर्नाटकाला मिळणार वाटा : बोम्मई

Share

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशाच्या प्रगतीचा भक्कम पाया घालणारे सर्व घटक आणि सर्वसमावेशक विकासाचा दृष्टीकोन असलेला प्रगतीशील अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मांडला आहे असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

विधानसौधच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पासंदर्भात मुख्यमंत्री बोम्मई यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, भारताला प्रगतीच्या वेगाने नेण्याचे पंतप्रधानांचे ध्येय आहे. स्वच्छ भारतापासून आर्थिक सुधारणांसाठी धाडसी पावले उचलण्यात आली आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पातील सर्व योजनांतून कर्नाटकाला वाटा येणार आहे. एमएसएमई, जलजीवन मिशन, ग्रामीण विकास, प्रधानमंत्री आवास योजना, शहरी पायाभूत सुविधांसह अनेक योजनांतून कर्नाटकला वाटा मिळेल. कर्नाटक हे प्रगतीशील राज्य असून पायाभूत सुविधांना महत्त्व दिले जात असल्याचे ते म्हणाले.

बोम्मई पुढे म्हणाले, आज जेव्हा आपण भारताच्या आर्थिक स्थितीची जगातील इतर विकसित देशांशी तुलना करतो तेव्हा आपला देश प्रगती करत असल्याचे दिसून येते. आमचा विकास दर 6 ते 6.8 आहे. इतर विकसित देशांची प्रगती फक्त २% आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम आहे. या अर्थसंकल्पाचे परिणाम जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण कृषी, सेवा आणि उत्पादन क्षेत्रात वाढ होत आहे आणि एकूण जीडीपी निरोगी आहे. ते म्हणाले की, सध्याच्या विकासाला अधिक बळ देणारे मूलभूत बदल आहेत.

केंद्रीय अर्थसंकल्पातील भांडवली खर्च 10 लाख कोटींनी वाढला आहे. त्यामुळे देशाच्या विकासाचा वेग वाढेल. या वाढीमुळे आर्थिक आणि सामाजिक विकासही शक्य होणार आहे. याशिवाय सामाजिक पायाभूत सुविधांसाठी अधिक निधी देण्यात आला असून, आगामी काळात सकारात्मक विकास पाहायला मिळेल, असे ते म्हणाले.

केंद्रीय अर्थसंकल्पात ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात आला आहे, ग्रामीण भागात घरे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान, ग्रामीण भागातील घरांसाठी पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी 70 हजार कोटी रुपये. अनुदान दिले. 2024-25 पर्यंत सर्व घरांना पिण्याचे पाणी पुरविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनुदानात वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक वेळी लघुउद्योगांना महत्त्व न दिल्याचा आरोप होत होता. एमएसएमईसाठी मर्यादा वाढवण्यात आल्या आहेत असे ते म्हणाले.

एकंदर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसमावेशक अर्थसंकल्प मांडल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिली आहे.

Tags: