भाजपच्या विजयसंकल्प अभियानानिमित्त माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी खानापूर तालुक्यातील नंदगड गावातील दुर्गा नगर येथे केंद्र व राज्य सरकारच्या कामानिमित्त जनजागृती केली.

माजी आमदार अरविंद पाटील यांनी कार्यकर्त्यांसमवेत घरोघरी जाऊन भाजपच्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. त्यांनी भाजपच्या लोक कल्याणकारी योजनांची नागरिकांना माहिती दिली. त्याचप्रमाणे घरांवर भाजपचे चिन्ह कमळ चित्र चिकटवले. यावेळी नंदगड ग्रामपंचायत सदस्य विजय कामत, प्रदीप पवार, सुरेश देसाई आदी उपस्थित होते.


Recent Comments